Kolhapur : भारतीय संविधानात समाविष्ट असणाऱ्या विविध मूल्यांचा समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रचार प्रसार व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना संविधानातील हक्क अधिकार, कर्तव्ये समजावेत व एक सुजाण नागरिक म्हणून असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या यांचीही माहिती विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी उद्या (दि- 20 मार्च ) रोजी सकाळी 9.00 वाजता ‘संविधान संवाद अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेने या अभियानाची सुरुवात,चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने करण्यात येत आहे यामध्ये लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांनी सांगितले.
‘संविधान संवाद अभियान’ हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्राच्या माध्यमातून समन्वय साधून आयोजित करण्यात येणार असून, तसे नियोजन करण्यात आले आहे. सदर अभियान पुढील वर्षभर चालणार असून अभियानाची सुरुवात महावीर महाविद्यालयापासून होत आहे. महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन, विद्यार्थ्यापर्यंत संविधान व त्याची महती पोहोचवून एक सुजाण नागरिक घडविण्यात हातभार लावण्यात येणार असल्याचे मत विशाल लोंढे यांनी मांडले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









