प्रतिनिधी /पणजी
आरजी हॉस्पिटल गोवातर्फे पुन्हा एकदा ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जीजवळील गोवा विद्यापीठ मैदानावर रविवार दि. 25 रोजी ’आरोग्यदायी जीवनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागरूक प्रयत्न’ या थीम अंतर्गत वर्षातील सर्वात मोठी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अल्ट्रा फिट अभिनेता व सुपरमॉडेल मिलिंद सोमण हे स्पर्धेचे नेतृत्त्व करतील अशी माहिती आरजी हॉस्पिटल्स प्रमुख आणि संघटक डॉ. अंजुम महाबारी यांनी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोवा ऍथलेटिक असोसिएशनचे सरचिटणीस परेश कामत, तांत्रिक समिती व परीक्षा अध्यक्ष श्रीपाद कुंडईकर, उपतांत्रिक अधिकारी चेतन कवळेकर, वरिष्ठ सल्लागार मायक्रोबायोलॉजी डॉ. मारझूक, वरि÷ सल्लागार, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी डॉ. वर्धन भोबे, फिजिशियन इंटर्नल मेडिसीन डॉ. सचिन नंदकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत शहराच्या विविध भागातून आणि महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी शेजारील राज्यांमधून 4000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होतील. या शर्यतीत 5कि.मी, 10कि.मी आणि 21कि.मी धावण्याच्या तीन प्रकारांचा समावेश आहे आणि ही शर्यत श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमपासून सुरू होईल आणि परत तिथेच समाप्त होईल. याशिवाय गोवा ऍथलेटिक असोसिएशनचे 60 अधिकारी या मॅरेथॉनमध्ये प्रतिनिधी म्हणून असतील अशी माहिती गोवा ऍथलेटिक असोसिएशनचे सरचिटणीस परेश कामत यांनी यावेळी दिली.
डॉ. मारझूक, आरजी हॉस्पिटल, डॉ. वर्धन बोभे, सीनियर कन्सल्टंट – जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि डॉ. अंजुम फोम आरजी हॉस्पिटल्स आणि ऑर्गनायझर म्हणाले, ‘आम्ही सर्वजण आरजी मॅरेथॉन चॅम्पयिनशिप चॅम्पियनशीप 2022 च्या दुसऱया आवृत्तीचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहोत. गेल्या वषी राज्यभरातील लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि या वषीही मोठय़ा संख्येने सहभागी होण्याची खात्री आहे.’निरोगी लोकसंख्येवर जोर देण्यात अग्रेसर असल्याने, आरजी हॉस्पिटल वयानुसार आणि तंदुरुस्त राहताना शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी धावणे ही एक उत्तम कसरत म्हणून ओळखले जाते. ही मॅरेथॉन सर्वांना कृती, सहभाग आणि चांगल्या आरोग्याच्या उत्सवात ऊर्जा प्रज्वलित करण्याची खुली संधी प्रदान करते. चला आनंदाने भरलेल्या धावण्याचा आनंद घेऊया. नोंदणीसाठी rghospitals.com/marathon-goa भेट द्यावी.









