सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत आणि प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटी आयोजितगणेशचतुर्थी निमित्ताने गतवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकानिहाय स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित केली असून प्रत्येक तालुक्यात होणार आहेयासाठी त्या त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून शुक्रवार . २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर* दरम्यान घेण्यात येणार आहे.
आपल्या गणेशाच्या विसर्जनाच्या कमीत कमी एक दिवस अगोदर पर्यंत आपला व्हिडीओ पाठवणे अनिवार्य आहे, त्या नंतर आलेला व्हिडीओ स्पर्धेसाठी विचारात घेतला जाणार नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचे, चलचित्राचे एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून आम्हाला वॉटसअप द्वारे पाठवायचा आहे. सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवायचा आहे*
ही स्पर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात घेण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशी जिल्ह्यात एकूण चाळीस पारितोषिके दिली जातील.परिक्षक स्पर्धेचे व्हिडीओ पाहून आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन परिक्षण करतील व त्याबाबतचा निकाल जिल्हा काँग्रेस कार्यालयात सादर करतील. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील* यांच्या हस्ते करण्यात येईल.
परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रथम पारितोषिक ११,१११/-
द्वितीय पारितोषिक ७७७७/-
तृतीय पारितोषिक ५५५५/-
उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिक प्रत्येकी ११११/- व प्रमाणपत्र
अशी प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. गेल्यावर्षी ज्यांना पारितोषिक मिळालेले आहे त्यांना या वर्षी स्पर्धेत भाग घेता येईल परंतू पहिल्या तीन क्रमांकात नंबर काढला जाणार नाही. ही स्पर्धा दर वर्षी होईल गतविजेते स्पर्धक तीन वर्षांनी पहिल्या तीन क्रमांकातील पारितोषिक घेण्यास पात्र ठरतील.*
तालुकानिहाय समन्वयक-विधाता सावंतवेंगुर्ल(9579422631)प्रकाश डीचोलकर- वेंगुर्ला(94224 36017)मेघनाद धुरी- मालवण
(9422096765)अरविंद मोंडकर- मालवण(9892055820)
अभय शिरसाठ – कुडाळ
(7350133444)विजय प्रभू- कुडाळ (94238 84492)
प्रदीप मांजरेकर – कणकवली
(94224336880)प्रविणवरुणकर- कणकवली (94041 67438)
वसंत नाटेकवैभववाडी(8805768570)
मीनाताई बोडके- वैभववाडी
(9404743605)
रविंद्र म्हापसेकर- सावंतवाडी
(9422055227)
समीर वंजारी- सावंतवाडी
(9822454023)
रुपेश आईर- सावंतवाडी
(9405478079)
वासुदेव नाईक – दोडामार्ग
( 9403351151 )
सुभाष दळवी- दोडामार्ग
(9421245595)
उल्हास मणचेकर – देवगड
(9422434986)
उमेश कुलकर्णी – देवगड
(9821936472)
अधिक माहितीसाठी जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक अरविंद मोंडकर 9892055820
यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख
यांनी पत्रकार परिषदेत मगलवारी केले. माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, रविंद्र म्हापसेकर, सुधीर मल्हार, राघवेंद्र नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, अमिधी मेस्त्री, समीर वंजारी, सुमेधा सावंत, माया चिटणीस, उपस्थित होते.