दोडामार्ग – वार्ताहर
तळेखोल येथील शिवजयंती उत्सव समिती, महिला बचत गट ग्रामस्थ व श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी यांच्यातर्फे रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौड आयोजित केली आहे. सकाळी ९ वाजता दीप प्रज्वलन, भारत माता प्रतिमा व भगवा ध्वज पूजन, उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मान्यवरांचे मार्गदर्शन, ९:३० वाजता श्री दुर्गामाता दौड प्रारंभ, १०:३० वा. दौड समारोप व कार्यक्रम समारोप होणार आहे. तळेखोल भटवाडी येथील दशरथ सावंत यांच्या प्रांगणातून दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार असून तळेखोल वाटुळवाडी येथील श्री राष्ट्रवादी महाविष्णू सभा मंडपात या दौडचा समारोप कार्यक्रम संपन्न होणार आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरुण पवार, मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष ॲड सोनू गवस हे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्त्या म्हणून मातृभूमी शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोनल लेले तर अतिथी म्हणून मातृशक्ती प्रमुख विनिता देसाई, शिव संस्कार कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, सरपंच वंदना सावंत व तळेखोल शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सगुण मोरजकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. तसेच महिलांनी नऊवारी व पुरुषांनी भगवा/पांढरा सदरा व पायजमा अशा भारतीय वेशात यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.









