Organized Diwali show time at Vengurle Hospital Naka
वेंगुर्ले हॉस्पिटल नाका येथे हॉस्पिटल नाका कला-क्रीडा मंडळाच्या वतीने दिवाळी सण कालावधीत दीपावली शो टाईम २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि. 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता दांडिया नृत्य, मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, बुधवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 7 वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा ‘किमीचछक्र व्रत’ नाट्यप्रयोग, गुरुवार दि. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर हा बहारदार मनोरंजन कार्यक्रम होणार आहेत. प्रथम येणाऱ्या 50 स्पर्धकांना प्राधान्य असून यासाठी अधिक माहितीसाठी योगेश गोवेकर- 9689720716 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









