न्हावेली / वार्ताहर
श्री ब्राम्हणदेव दत्तप्रसाद कला क्रिडा मंडळ,मळेवाड भटवाडी ग्रामस्थ येथे रविवार ५ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ४ वाजता उद्धाटन व ७ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
पुढीलप्रमाणे सहभागी संघाची नावे सायंकाळी ७ वाजता श्री रवळनाथ नवतरुण प्रासादिक भजन मंडळ,ओटवणे ( बुवा – आत्माराम कवठणकर ) सायंकाळी ७.४५ वाजता श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ,निरवडे ( बुवा – नरेंद्र बोंद्रे ) रात्री ८.२५ वाजता श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड सावंतवाडा ( बुवा – सचिन सावंत ) रात्री ९.१५ वाजता श्री देव मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरुर ( बुवा – भार्गव गावडे ) रात्री ९.५० वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) रात्री १०.४० वाजता श्री कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ,वेत्ये ( बुवा – प्रथमेश निगुडकर ) रात्री ११.२० वाजता श्री देव गोठण प्रासादिक भजन मंडळ,वजराट ( बुवा – सोमेश वेंगुर्लेकर ) रात्री १२.१५ वाजता श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ,साटेली ( बुवा – सत्यनारायण कळंगुटकर ) हे संघ सहभागी होणार आहे.
प्रथम पारितोषिक ५००० रुपये सम्नानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ३००० रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक २००० रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उकृष्ट हार्मोनियम ५०१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट गायक ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट पखवाज ५०१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट तबला ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट झांज ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट कोरस ५०१ रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहे लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.