वार्ताहर / कुडाळ
गोवेरी येथे श्री सत्पुरुष कला क्रीडा मंडळ गोवेरी, ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय गोवेरी आणि देवस्थान कमिटी गोवेरी यांच्या सयुक्त विद्यमाने १८ वे वर्ष कै.वसंत गावडे बुवा जिल्हास्तरीय भजन स्पर्धा गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष मंदिरात २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत दररोज प्रत्येकी ४ अशी एकूण १६ भजने होणार आहेत.
या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक ५५५५ रुपये, द्वितीय ३५५५ , तृतीय २५५५ व सर्व स्पर्धेकांना चषक देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धेकांना एक हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गायक ,उत्कृष्ट हार्मोनियम ,उत्कृष्ट पखवाज वादक ,उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज वादक यांना वैयक्तीक बक्षीसे प्रत्येकाला चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी भजन मंडळाना सातशे रुपये मानधन व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भजन स्पर्धेत कोणती भजन मंडळे सहभागी होतील याबाबत 12 ऑक्टोबर रोजी निश्चित करून भजन मंडळांना कळविण्यात येणार आहे. इच्छुक भजन मंडळांनी आपली नाव १० ऑक्टोबर पर्यंत सतीश गावडे मोबाईल नंबर -९४०४९१६८८८ व केशव गावडे यांच्याकडे द्यावीत.









