Organized District Level Abhang Singing Competition at Achra – Hirlewadi
माघी गणेश जयंती उत्सव मंडळ आचरा – हिर्लेवाडी मंडळाच्या वतीने आयोजित गुरुवारी २६ जानेवारी रोजी स्वराभिषेक आचरा जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन पंढरीनाथ मंदिर आचरा हिर्लेवाडी येथे करण्यात आले आहे. या अभंग गायन स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक ५००१ रु. आणि चषक ,द्वितीय क्रमांक ३००१ रू.आणि चषक ,तृतीय क्रमांक २००० रू.आणि चषक तर उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी वयोमर्यादा १६ ते ३० राहणार असून पारंपरिक अभंग गायन बंधनकारक राहणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पात्रता फेरी घेण्यात येणार असून मोबाईल नंबरवर 3 मिनिटाचा आपला एखादा अभंग ऑडिओ २० जानेवारी अगोदर पाठवावा.आलेल्या व्हिडीओ मधून अंतिम १८- २० स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंटी तांडेल 8411029606, विनय वझे 8007119054 यांचा शी संपर्क साधावा असे आव्हान माघी गणेश जयंती उत्सव मंडळ आचरा हिर्लेवाडी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आचरा प्रतिनिधी









