न्हावेली / वार्ताहर
Organized classical singing competition on April 30 in Aajgaon!
श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रिडा मंडळ, आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राधाकृष्ण चषक या संगीत उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा मर्यादित शास्रीय गायन ( हिंदुस्थानी ख्याल ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार ३० एप्रिलला दुपारी ३ वाजता श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे परिक्षण जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्रीय गायिका मंजिरी आलेगांवकर करणार असून यावेळी त्या शास्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना मार्गदशनही करणार आहेत यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधानाच्या संस्थापिका विणा दळवी यांनी केले आहे.









