सावंतवाडी : प्रतिनिधी
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे स्वातंत्र्यदिनाचे ओचित्य साधून तालुकास्तरीय ‘वंदे मातरम समूह गायन व नृत्य ‘स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांच्याहस्ते झाले . यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे विभागीय मॅनेजर बाळासाहेब पांडव, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, शाखा व्यवस्थापक शशांक विचारे ,परीक्षक मयूर पिंगुळकर, दुर्गा सरनाईक , तरुण भारत संवादचे जिल्हा वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर, उपस्थित होत्या. स्पर्धेत लहान व मोठ्या गटातील बारा संघानी सहभाग घेतला









