प्रतिनिधी / खानापूर : केएलइ हॉस्पिटल बेळगाव आलं फलाह बेळगाव व फ्रेंड सर्कल खानापूर यांच्यावतीने बासीबन उर्दू हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सकाळी दहा वाजता नगराध्यक्ष मजहर खानापुरे नगरसेवक रफिक वारेमिनी यांच्या रक्तदानाने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगाव अलफलाह संघटनेचे अध्यक्ष अब्दुल कदर घीवाले सद्दाम बडेघर, शाहरुख पटेल, झाकीर बडेकर, इरफान पठाण, ईलीयास पठाण यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.









