जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्धघाटन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
आपल्या भागातील युवक, युवती, तसेच मोठ्या गटातील व्यक्ती बुद्धीबळ सारख्या खेळात भविष्यातील चाली पुढे कशा कराव्यात याचा संयमाने विचार करून सोंगट्या चालवित विजय संपादन करण्याचा खेळ हा साध वाटत असला तरी आपण संयम साधून विजय प्राप्त करा. तसेच या कार्यकर्ते व खेळाडूंकडून केलेल्या मागणीनुसार आपण लवकरच राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे वेंगुर्लेत आयोजन करून शहरासह तालुक्यातील व जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना त्यांच्या बरोबरीने उत्कृष्ठ खेळाडू बनविण्यासाठी प्रयत्न करेन. अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी दिली.
वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे वेंगुर्ले नगर वाचनालय हॉल येथे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार २९ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, व शहर प्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांत जिल्हा संघटक सुनिल डुबळे, जिल्हा संघटक सुनील मोरजकर, महिला शहर संघटक श्रध्दा बावीस्कर, ओबीसी महिला शहर संघटक शबाना शेख, युवक शहर प्रमुख संतोष परब, परीक्षक कौस्तुभ पेडणेकर (सावंतवाडी), श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली), यांचा समावेश होता.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवरातील नितीन मांजरेकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रेरणेने सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय भव्य बुध्दीबळ स्पर्धा होत आहे. या शहरातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेने सुचविलेली विकास कामे हि दिपक केसरकर यांच्या माध्यमातून तातडीने मंजुर करून घेण्याचे काम सचिन वालावलकर यांनी केलेले आहे. त्यामुळे यापुढेही अशीच सर्वांगीण विकासाची कामे त्यांच्याकडून व्होवोत. असे विचार व्यक्त केले. तर उमेश येरम यांनी, जिवनाच्या बुद्धीबळ स्पर्धेत यशस्वी झालेले उत्तम उदाहरण म्हणजे सचिन वालावलकर होय असे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्पर्धेचे नियोजक माजी नगरसेवक अभिषेक वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक दाभोलकर, संदिप परब, राजू पालकर, शिरी जाधव यांनी केले. यावेळी बळीराम आडेलकर, बी. आर. तानावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा खुला गट आणि लहान गट अशा दोन गटात होणार असून १२० स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतलेला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालनाचे काम शिवसेना युवक शहर अध्यक्ष संतोष परब यांनी पाहिले.









