जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या सूचना
Organize Anganewadi and Kunkeshwar Devgad Jtrautsav Prepare disaster management plan
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रौत्सवा-२०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये.या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समित्यांनी यात्रा नियोजनाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनास सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात श्री.देवी भराडी वार्षिक जत्रौत्सव २०२३ व श्री. स्वयंभू देव कुणकेश्वर देवगड वार्षिक जत्रौत्सव -२०२३ नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, कुडाळ प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, मालवण तहसिलदार श्रीधर पाटील, देवगड तहसिलदार स्वाती देसाई, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, गट विकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, विविध विभागांचे प्रमुख, आंगणे कुंटुंबिय, आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी