प्रतिनिधी/बेळगाव : काल बेंगळुरू मध्ये झालेल्या घेण्यात राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत यंदाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारी साठी आवश्यक वस्तू, साहित्य यांची खरेदी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. बेळगावला सुवर्ण विधान सौध बांधून यंदा १२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ह्या अधिवेशनाला विशेष महत्व असणार आहे. बेळगावात १२ वर्षा पूर्वी सुवर्ण विधान सौध बांधण्यात आले तेव्हा लोकांनी अक्षरश: फटाके फोडून जल्लोष केला होता .उत्तर कर्नाटकातील १४ जिल्ह्यातील लोकांनी सुवर्ण विधान सौध इमारत म्हणजे केवळ शोभेची वस्तू बनली असून जनतेच्या पैश्याची उधळपट्टी करून सरकारी जत्रा बेळगावात भरविण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप जनतेने केला आहे.
दरम्यान ह्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे राज्य सरकार कडून सांगण्यात आल्याने या अधिवेशनाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









