प्रतिनिधी
बांदा
घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत चालणा-या या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक ,व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त नियोजन बैठक अध्यक्ष श्री राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन्न झाली. मंडळाने या बैठकी मध्ये विविध धार्मिक , व सांस्क्रुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दि.१५ आँव्टो. रोजी श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल,सोमवार दि १६आँव्टो. रोजी देवीचा गोंधळ व जागर ,मंगळवार दि.१७ आँव्टो. रोजी.पार्सेकर दशावतार यांचा नाट्य प्रयोग,दि.बुधवार दि.१८ आँव्टो. गुरूवार दि १९ रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा प्रथम क्र. ७७७७/- रु रोख, द्वितीय क्र.५५५५/- रू रोख,तृतीय क्र.३३३३/-रू .रोख व हिट जोडी. साठी आकर्षक पारीतोषीक,शुक्रवार दि. २० आँव्टो. “सिंगिंग काँपिटीशन्स” , प्रथम क्र.५०००/रू. रोख, द्वितीय ३०००/रू रोख, तृतीय क्र.२०००/ रोख बक्षीसे, व ग्रुपडान्स स्पर्धा या स्पर्थेसाठी आकर्षक बक्षीसे, शनीवार दि. २१ आँव्टो. रोजी(१२वर्षाखालील) लहान मुलांनसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्र.२२२२/रोख, द्वितीय क्र.११११/रू रोख, तृतीय क्र.५५५/रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे व रेकार्डडान्स स्पर्धा प्रथम क्र.३३३३/रू रोख, द्वितीय क्र.२२२२/रु रोख तृतीय क्र.११११/रु रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे,रवीवार दि. २२आँव्टो. रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, सोमवार दि.२३आँव्टो रोजी गोव्यातील नामांकीत आँक्रेस्ट्रा व मान्यवरांच्या उपस्थित सर्व स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ,मंगळवार दि.२४आँव्टो विसर्जन मिरवणुक सांय ५वा. दांडीया स्पर्धेसाठी संपर्क ऊकार नाडकर्णी 9075857558 , व अक्षय मयेकर 9503871924, सिंगीग,रेकार्ड डान्स, ग्रुप डान्ससाठी धनेश नाटेकर 9405496860,अनिकेत येडवे 8390241842, फँन्सी ड्रेससाठीअर्णव स्वार 9075729966 संपर्क करावा.यावेळी
उपाध्यक्ष श्री अनील नाटेकर, सचिव विवेक विरर्नोडकर, खजीनदार ओंकार नाडकर्णी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते, या नवरात्र उत्सवात भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे क्रुपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले.









