प्रतिनिधी / बेळगाव : बालदिनाचे औचित्य साधून लोकमान्यच्या आर.सी. नगर शाखेच्यावतीने राणी चन्नमा नगर येथील विमल इंग्लिश मेडीयम हायर प्रायमरी स्कुलमध्ये १० नोव्हेंबर रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप ए आणि पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेतली गेली. ग्रुप ए मध्ये – प्रणिका शेलूर हिने प्रथम, इशिका गवळी हिने द्वितीय तर अफिया मुजावर हिने तृतीय क्रमांक मिळवला. ग्रुप बी मध्ये प्रेम पाटील याने प्रथम, रोहन हणमशेट याने द्वितीय तर श्रेया घावरे हिने तृतीय क्रमांक मिळवला. १४ नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी विमल इंग्लिश मेडीयम हायर प्रायमरी स्कुलच्या अध्यक्षा विमल भुजंगराव यळ्ळूरकर, संस्थापक व प्रिन्सिपल पंकज भुजंगराव यळ्ळूरकर आणि स्कुलच्या सर्व शिक्षकवृंदाचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी लोकमान्यच्या आर.सी. नगर शाखेचे मॅनेजर जीवन गुरव, असिस्टंट मॅनेजर उमेश सुतार, स्मिता जाधव, अक्षता चौगुले आणि मोहन बामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.









