आचरा प्रतिनिधी
सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त वायंगणी-चिंदर -त्रिंबक -आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य “राखी बनविण्याची स्पर्धा”आयोजित केली आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रुपये 1500/-, द्वितीय पारितोषिक – रुपये 1000/-
,तृतीय पारितोषिक – रुपये 500/- अशी बक्षिसे आहेत. सर्व आबालवृद्धांनकरिता विनामूल्य प्रवेश राहणार आहे. राखी बनवताना एक मोबाईल विडिओ काढून तो परीक्षकांनी मागितल्यास त्यांना द्यावायचा आहे. इको फ्रेंडली राखीना प्रथम प्राधान्य राहील. तयार राखी दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत खाली दिलेल्या व्यक्तींकडे आहेर पाकिटात घालून त्यावर आपल नाव, पूर्ण पत्ता,आणि आपला व्हाट्स ऍप संपर्क क्रमांक लिहावा.अधिक माहितीसाठीतसेच राखी जमा करण्यासाठी संपर्क क्रमांक वायंगणी-श्री. संतोष वायंगणकर 7875201257, त्रिंबक- प्रविण बागवे 9699069176, चिंदर- भाई तावडे 094207 92990, आचरा-भाग्यश्री मेडिकल आचरा 9420308384, अनिकेत पांगे 9420260716 यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









