खानापूर प्रतिनिधी – खानापूर तालुक्यातील अतिक्रमण करून कसत असलेल्या शेतकऱ्यांना, अतिक्रमित भू संघटनेच्या वतीने सोमवारी १७ रोजी येथील शिवस्मारकात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात ५ हजार एकर जमीन अतिक्रमित असून हे शेतकरी भूमीहीन आहेत, ते शेतकरी ही जमीन गेले कित्येक वर्ष कसत आहेत. याबाबत गेल्या अनेक वर्षे या संघटनेच्या माध्यमातून लढा देण्यात आला होता. २००६ साली केंद्र सरकारने अतिक्रमित जमिन शेतकऱ्यांना देण्यात याव्यात असे बील पास होते. मात्र राज्य सरकारने याबाबत भूमिका घेतलेली नव्हती. संप्टेबरच्या १३ तारखेला कर्नाटक सरकारने अतिक्रमित जमिन कसत असलेल्या शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. यासाठी काही कागदपात्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे . यासाठी शेतकऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता शिबिर आयोजित करण्यात आलेआहे . अशी माहिती अतिक्रमित भू संघटनेचे अध्यक्ष बाबुराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









