Organization of grand body building competition on February 10 at Oros-Sindhudurgnagari
सिंधूसंकल्प महोत्सवा अंतर्गत करण्यात आलय आयोजन
ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे सिंधू संकल्प महोत्सवानिमित्त दिनांक 10 फेब्रुवारी रोजी भव्य बक्षीस रकमेच्या ” सिंधुदुर्गनगरी श्री ” खुल्या शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्या शरीरसौष्ठव व पटूला ”सिंधुदुर्गनगरी श्री किताब” 25 हजार रुपये रोख ,आकर्षक ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेतील मोस्ट इम्प्रूव खेळाडूंना पाच हजार रुपये रोख व आकर्षक चषक बेस्ट पोझर किताब मिळवणाऱ्या खेळाडूला पाच हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा पाच ग्रुप मध्ये खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेतील मेन फिजिक प्रकारातील प्रथम क्रमांक विजेत्याला सात हजार रुपये रोख , मानाचा जरीपट्टा , आकर्षक चषक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाणार आहे . द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये व ट्रॉफी , तसेच पाचव्या क्रमांकास एक हजार रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे . सहभागी सर्व स्पर्धकांना ट्रॉफी मेडल व सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी वजन गट 50 ते ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७०, व 70 ते 75 असा राहणार आहे . दिनांक १० फेब्रुवारी या स्पर्धेच्या दिवशी सायंकाळी ५ ते ६ वाजता स्पर्धकांची नाव नोंदणी व वजन घेणे चालू होणार आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी परेश परब 9423301479 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी









