जागतिक अवयव दान दिनानिमित्त बक्षीस वितरण
प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्स प्राईड सहेली, मोहन फाउंडेशन, यशस्विनी उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अवयव दान दिनाचे औचित्य साधून मॉडेल इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रांगोळी, निबंध, चार्ट मेकिंग, कॉम्पिटीशन, कविता अशा अनेक स्पर्धा झाल्या. यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण मनीषा अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. बी. के. मॉडेल स्कूलच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
निर्मला यांनी प्रार्थना म्हटली. प्रास्ताविक आरती शहा यांनी केले. मनीषा बेनके यांनी अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे व अवयव दान सर्वांनी का केले पाहिजे याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. डॉ. सुचिता कुलकर्णी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मोहन फाउंडेशनच्या शीतल मुंदडा व यशस्वी उद्योजकतेचे कुमार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिग्ना शहा यांनी केले. आभार डॉ. सुचिता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनाली शहा, रूपा मंगावती, मधु नाईक, संगीता चिटणीस, तसेच मॉडेल इंग्रजी माध्यममधील शिक्षकांनी मदत केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.









