आज जागतिक अवयवदान दिन : अवयव प्रत्यारोपणावर अरिहंत हॉस्पिटलचा जोर : नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यरत
आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांना नवजीवन देण्याची ताकद आपल्या हातात आहे. अवयवदान हा केवळ वैद्यकीय उपचार नसून तो माणसाने देऊ शकणारा सर्वात नि:स्वार्थ उपहार आहे. जागतिक अवयवदान दिन 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस अवयवदानाचे महत्त्व आणि गरज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी साजरा केला जातो. भारतात अवयव प्रत्यारोपणाची गरज खूप मोठी आहे. दरवषी हजारो लोक अवयव निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचतात. पण अत्यल्प ऊग्णांनाच वेळेत प्रत्यारोपण मिळते. हे वैद्यकीय कमतरतेमुळे नसून दात्यांची कमतरता असल्यामुळे घडते.
एक अवयवदाता आठ जणांचे प्राण वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि आतडे हे अवयव गरजू ऊग्णांना देता येतात. तर कर्णपटल, त्वचा, हृदयाची झडपे, दृष्टिहीन असलेल्यांना पुन्हा दृष्टी देता येते. अरिहंत हॉस्पिटलमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून काम करताना आपण अवयव प्रत्यारोपणासाठी वाट पाहणाऱ्या ऊग्णांचा संघर्ष आणि अवयवदानाने त्यांच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल प्रत्यक्ष पाहिला आहे. अंतिम टप्प्यातील मूत्रपिंड निकामी झालेल्या ऊग्णांसाठी डायलिसिस हा तात्पुरता उपाय आहे. पण मूत्रपिंड प्रत्यारोपणच त्यांना खऱ्या अर्थाने सहजपणे जगता येण्याचे स्वातंत्र्य देते.
दुर्दैवाने, भीती, गैरसमज आणि जागऊकतेचा अभाव, यामुळे अनेक जण अवयवदान करण्यास पुढे येत नाहीत. अवयवदान ही प्रक्रिया अत्यंत सन्मान, मानवी मूल्ये आणि वैद्यकीय नैतिकता पाळून केली जाते. हे समजून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रमुख धर्म या पवित्र कार्याचे समर्थन करतात. अरिहंत हॉस्पिटल उत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण सेवा, अत्याधुनिक सुविधा, तज्ञांची टीम आणि नैतिक पद्धत यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येकाने अवयवदाता म्हणून नोंदणी करावी आणि आपल्या कुटुंबीयांना हा निर्णय सांगावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या जागतिक अवयवदान दिनानिमित्त आपण प्रतिज्ञा करूया की आपण आपले अवयव सोबत घेऊन जाऊ शकत नाही, पण आपण जीवनाची अमूल्य परंपरा मागे ठेवू शकतो.
– डॉ. विजयकुमार व्ही. पाटील,नेफ्रॉलॉजिस्ट आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ञ, अरिहंत हॉस्पिटल, बेळगाव









