प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आदेश ; मोर्ले वासियांच्या उद्रेकानंतर प्रशासनाला जाग
दोडामार्ग – वार्ताहर
मोर्ले गावातील हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण गवस हे ठार झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी तसेच तालुक्यातील अन्य ग्रामस्थांनीही हत्ती पकड मोहीम राबवा अन्यथा सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही. तसेच गावातून एकाही वन अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) एम. श्रीनिवास राव यांनी दोडामार्ग तालुक्यातील ओंकार नावाच्या वन्यहत्तीला बेशुद्ध करून प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने पकडण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेशपर पत्र देखील राव यांनी जारी केले आहे. मात्र आदेश जरी दिले असले तरी प्रत्यक्षात हत्ती पकड केव्हा होईल याबाबतची प्रतीक्षा ग्रामस्थांत आहे.









