वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी चालविलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना दिला आहे. या प्रकरणात तीस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती प्रमुख आरोपी आहेत. हे दोन्ही आरोपी पोलिसांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका गुजरात पोलिसांनी सादर केली होती.
सेटलवाड यांच्याविरोधात अद्याप आरोपपत्र सादर करण्यात आलेले नाही. तरीही सेटलवाड आणि त्यांचे पती यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करणे आवश्यक आहे. हे पैशाच्या अपहाराचे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे त्याची चौकशी योग्यप्रकारे होणे आवश्यक असून सेटलवाड दांपत्याने सहकार्य करावे, असा आदेश न्या. संजयकिशन कौल यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने दिला.









