सावंतवाडी : प्रतिनिधी
लोकनेते भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी ज्युनिअर कॉलेजला सांघिक विजेतेपद मिळाले. या स्पर्धेत तन्वी तुकाराम सावंत हिने प्रथम क्रमांक पटकाविला. कशीष दत्तप्रसाद खडपकर हिने दुसरा, जिगिषा दत्ताराम सावंत हिने तिसरा क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ क्रमांक सौम्या संदेश मणेरीकर आणि वरूण मनोहर देवधर यांना देण्यात आला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाना अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकाना प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पत्रकार राजेश मोंडकर आणि प्रा. हर्षवर्धिनी सरदार यांनी काम पहिले. स्पर्धेत ३८ जणांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा उदघाटन सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी खजिनदार सी. एल. नाईक, दिनेश नागवेकर, सदस्य अमोल सावंत, सतीश बागवे, व्ही. बी. नाईक, प्राचार्य जगदीश धोंड, उपप्राचार्या डॉ. सुमेधा नाईक, वसुधा मुळीक, के. टी. परब, सोनाली सावंत, बाळासाहेब नंदीहळी, स्पर्धाप्रमुख प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









