Orange Side Effects : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात संत्री यायला सुरुवात होते. आंबट-गोड अशी संत्री सगळ्यानांच खायला आवडतात.संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि पाण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. शरीराला हायड्रेट ठेवून प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम संत्री करते. संत्री हे शरीरासाठी फायदेशीर आहेच मात्र, जादा संत्री खाल्याने आपले नुकसानही होवू शकते. संत्र्यामध्ये कॅलरीज, पाणी, प्रथिने, कार्ब्स, साखर, फायबर आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. ते जास्त खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.आज जाणून घेऊया जादा संत्री खाल्याने आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होतात आणि दिवसातून किती संत्री खावे.
तुम्ही खूप संत्री खाल्ल्यास काय होते?
तुम्ही जर दिवसभरात ४-५ संत्री खात असाल तर, यामुळे शरीरातील फायबरचे प्रमाण थोडे वाढेल.त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे आणि मळमळ यासारख्या समस्या सुरू होतात.व्हिटॅमिन-सीचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ,उलट्या होणे,झोप न लागणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.
एका दिवसात किती संत्री खाणे योग्य आहे?
-संत्र्यामध्ये पोटॅशियमची पातळी कमी असते, परंतु जर शरीरात आधीच जास्त पोटॅशियम असेल तर ते हायपरक्लेमिया नावाची संभाव्य गंभीर स्थिती होऊ शकते.
-काही गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते.पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेल्या लोकांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.-
संत्री अम्लीय असतात. त्यामुळे ज्यांनी पित्तांचा त्रास जास्त आहे त्यांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-एका दिवसात 1 किंवा 2 पेक्षा जास्त संत्री खाऊ नका
Disclaimer:वर लेखात दिलेली माहिती वाचकांना माहिती द्यावे एवढ्याच उद्देशाने देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Previous Articleलोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविकेवर चाकू हल्ला
Next Article ….तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल









