जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिला सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु असून हवामान खात्याने ६ जुलैला अति ते अतिमुसळधार ऑरेज अलर्ट आणि ७,८,व ९ जुलैला मुसळधार पावसाचा, यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. गरज नसताना घराच्या बाहेर कुणी पडू नये ,समुद्री किनारी जाऊ नये असे आवाहन केले असून जिल्हा व तालुका स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून आपत्कालीन मदतीसाठो नियंत्रण कक्षाशी सपर्क करण्याचे आवाहनही केले आहे.









