पाली सत्तरी येथे अभयारण्य कर्मचारी-स्थानिकांत वाद
प्रतिनिधी /वाळपई
सध्या सत्तरी तालुक्मयात विविध भागांत धबधबे प्रवाहित झाले असून याठिकाणी मौजमजा करण्यासाठी स्थानिक व राज्यभरातून पर्यटक येऊ लागलेले आहेत?. आज रविवारी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी पहावयास मिळाली. मात्र अभयारण्याच्या कर्मचारी पर्यटकांकडून शुल्क आकारणी करतात. या मुद्दय़ावरून कर्मचारी व स्थानिकामध्ये संघर्ष पहावयास मिळाला. पाली – सत्तरी येथे अशाच प्रकारची पर्यटकांची लुबाडणूक होत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी याला आक्षेप घेतला. त्यानंतर सदर प्रकार बंद झाल्याची माहिती स्थानिकांकडून उपलब्ध झालेली आहे.
पाली सत्तरी येथे शुल्क आकारणीची बाब स्थानिकांना कळताच स्थानिकांनी या संदर्भात तीव्र आक्षेप घेतला. नागरिकांनी कर्मचाऱयांना विचारणा केली असता वरि÷ अधिकाऱयांकडून प्रत्येक पर्यटकाकडून शंभर रुपये आकारण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा प्रकार अन्यायकारक असून पर्यटकांना लुबाडण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. नागरिकांची आक्रमकता पाहून शेवटी कर्मचाऱयांनी प्रत्येक पर्यटकांना मागे वीस रुपये आकारले.
पैसे घेतात मग सुविधा का नाही?
अभयारण्य व्यवस्थापन पर्यटकांकडून पैसे वसूल करत असेल तर या बदल्यात धबधब्यांवर सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र सदर ठिकाणी जाण्यासाठी धड रस्ता नाही तसेच महिलांना कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. असे असताना पर्यटकांकडून घेण्यात येणारे शुल्क हे कशासाठी असा स्थानिकांनी केलेला आहे. धबधब्यावर शौचालय व कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
पुढील शनिवारी व रविवारी पैसे आकारण्याचा प्रकार घडल्यास त्याला विरोध करण्यात येणार आहे. पर्यटकांना लुबाडण्याचा व त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास सत्तरी तालुक्मयातील धबधब्यावर कोणीही येणार नाही??. तसे झाल्यास स्थानिकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद होणार, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
वाळपई बाजारपेठेला मोठा लाभ
दरम्यान, पावसाळय़ात तालुक्मयातील पर्यटनाला चालना मिळते. यामुळे चार महिने खास करून शनिवारी, रविवारी वाळपई परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. यामुळे वाळपईच्या बाजारपेठेतील व्यापाऱयांना याचा लाभ होतो. दारू व इतर खाद्य विकत घेण्यात येत असल्यामुळे बाजारपेठेला तेजी प्राप्त होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. यामुळे सत्तरीतील निसर्ग हा वाळपई बाजारपेठेला ऊर्जितावस्था निर्माण करणारा असल्याचा प्रतिक्रिया दुकानदारांनी व्यक्त केलेली आहे.









