संसदेतील घुसखोरीनंतर आज दोन्ही सभागृहांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. यावरुन सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यामुळं १५ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे.
यामध्ये लोकसभचे माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस तर राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन या खासदारांचा समावेश आहे.









