तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल ,असा दिला इशारा
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास भारतीय पिछडा शोषित संघटना तथा ओबीसी समाज संघटनेने विरोध केला आहे. याबाबत संघटनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विरोध दर्शवला . व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज पुऱ्या महाराष्ट्रात पेटून उठेल व रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे .
भारतीय पीछडा शोषित संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली विविध समाज संघटना एकत्रित येत जिल्हाधिकारी किशोर तावडे याची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी ओबीसी समाज संघटनेचे उपाध्यक्ष रमण वायंगणकर ,कुंभार समाजाचे चंद्रकांत कुंभार ,तेली समाजाचे लक्ष्मण तेली ,शिरोडकर ,कुंभार समाजाचे गणपत महादेव ,बुद्धिष्ट सोसायटीचे रावजी यादव ,चद्रशेखर माळवे,सुनील पाटकर आदी उपस्थित होते.









