नवी दिल्ली : हरियाणाच्या फतेहाबादमध्ये आयोजित आयएनएलडीच्या भव्य रॅलीसाठी भाजप विरोधात आघाडीसाठी प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. केंद्रातील भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या रॅलीला संबोधित करताना जेडीयू नेते के.सी. त्यागी म्हणाले की “काँग्रेसचे आठ माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये सामील झाले असतानाही बिहारचे मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्यासाठी पाटण्याहून आले आहेत. नितीश कुमार यांना ईडी, आयकर आणि इतर एजन्सीची कोणतीही भीती नाही.
माजी उपपंतप्रधान आणि INLD संस्थापक देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि शिवसेनेचे अरविंद सावंत हे देखील विरोधी एकजुटीसाठीच्या आयोजित रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
अनेक प्रादेशिक पक्षांचे एकत्र येणे हे विरोधी ऐक्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले जाते. नितीश कुमार आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद या रॅलीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्येष्ठ समाजवादी नेते त्यागी केसी यांनी ही एक ऐतिहासिक बैठक असल्याचे म्हटले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात समविचारी शक्तींचे एकत्रीकरण लक्षवेधक ठरेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









