वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बंदर विकासामध्ये कार्यरत असणाऱ्या पॅरादीप परिवहन लिमीटेडचा आयपीओ 17 मार्च रोजी सबस्क्रीप्शनसाठी खुला झाला आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 44.86 कोटी उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीचा आयपीओ 17 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 19 मार्चपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल. 45.78 लाख ताजे समभाग विक्रीसाठी सादर केले जाणार आहेत. या कंपनीचे खालिद खान, फौजिया खान, प्रवतकुमार नंदी आणि पार्वती प्रिया नंदी हे प्रवर्तक आहेत. 93-98 रुपये प्रती समभाग अशी इश्यू किंमत निश्चित करण्यात आली आहे.
किती गुंतवणूक मर्यादा
रिटेल गुंतवणुकदारांना कमीत कमी 1 लाख 11 हजार 600 रुपये गुंतवावे लागणार आहेत. 19 रोजी गुंतवणुकीसाठी आयपीओ बंद झाल्यानंतर 24 मार्च रोजी बीएसई, एसएमईवर समभाग सूचीबद्ध होणार आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी 50 टक्के, रिटेल गुंतवणुकदारांसाठी 35 टक्के आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15टक्के आयपीओ राखीव ठेवण्यात आला आहे.
काय करते कंपनी
बंदर विकासामध्ये कार्यरत असून लॉजिस्टीक, जहाजांची देखभाल आदी कामे हाताळते. कार्गो आयात आणि निर्यातीचे काम कंपनी पाहते.









