मुंबई
रशिया आणि युपेन यांच्यातील युद्धाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर जाणवत असून पोलादाच्या बाबतीतही तो जाणवतो आहे. चीनमध्ये सध्या पोलादाचे कमी उत्पादन घेतले जात असल्याने भारताला पोलाद निर्यातीची सुवर्णसंधी प्राप्त झाली असल्याचा अहवाल नुकताच जेएसडब्ल्यू स्टील यांनी सादर केला आहे. भारताला आगामी काळामध्ये पोलाद उत्पादनामध्ये वाढ करून याची निर्यात युरोप आणि मध्य आशियासह अमेरिकेला करता येणे शक्य होणार आहे. जागतिक स्तरावर पोलादाचे उत्पादन पहिल्या तिमाहीत 5 टक्के इतके घटले आहे.









