प्रतिनिधी,कोल्हापूर
Ajit Pawar News :लोकसभा निवडणुक महाविकास आघाडीने एकत्रित लढवायचे ठरविल्यास कोल्हापूर लोकसभा मतदार संघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल हे माहिती नाही, पण या मतदार संघामधून नवीन चेहऱ्याला संधी देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चेदरम्यान सांगितल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी भेट दिली.यावेळी आमदार हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी अगामी लोकसभा निवडणुकीबाबत सुमारे दीडतास चर्चा झाली.
भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले,डॉ. चेतन नरके हे उच्च शिक्षित आहेत. ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती देणारा दुग्धव्यवसाय,उद्योग, बँकींग, सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास आहे. स्वर्गीय डी.सी.नरके, सहकारातील ज्येष्ठ अरुण नरके यांचा सहकार आणि राजकीय वारसा चेतन यांना मिळाला आहे.जनतेत मिसळणारे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणारे हे नेतृत्व असल्याने विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांमधून जनसंपर्क वाढवा, असा मौलिक सल्ला यावेळी अजित पवार यांनी नरके कुटुंबियांना दिला.
गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके म्हणाले,अगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण आहे.आमदार हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार,विजय देवणे यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद पाहता जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास अरुण नरके यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राजेश पाटील,माजी आमदार के.पी.पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर,मनपाचे माजी स्थायी समिती सभापती आदील फरास, जिल्हा बँकेचे माजी संचालक संदीप नरके,सत्यशील नरके आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीत डॉ. नरकेंचे नाव चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना पक्ष प्रमुख (ठाकरे गट) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये डॉ. चेतन नरके यांचे नावा चर्चेत आहे.त्याचबरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत,राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे,प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून डॉ. चेतन नरके यांचे नाव आहे. त्यामुळे राज्यात अनेत ठिकाणी डॉ. नरके यांचे नाव चर्चिले जात असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
दीड तास चर्चा,अप्रत्यक्ष सल्ला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डॉ. चेतन नरके यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी अगामी लोकसभा निवडणुकीबाबत सुमारे दीड तास चर्चा झाली. यादरम्यान विरोधी पक्षनेते यांनी डॉ. नरके यांना जनसंपर्क वाढविण्याचा सल्ला देते अप्रत्यक्षरित्या लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेतच दिल्याची
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









