वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडविऊद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मे-जूनमध्ये लायन्सविऊद्ध दोन चार दिवसांचे सामने खेळविले जाणार असून त्यात भारताचे काही आघाडीचे खेळाडू ‘अ’ संघाचा भाग राहण्याची शक्यता आहे.
भारताचा इंग्लंड दौरा 20 जून रोजी हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीने सुरू होईल. 2007 नंतर परदेशातील पहिला मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सध्या सर्व प्रमुख भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या संबंधित आयपीएल संघांतून खेळत असून 25 मे रोजी अंतिम सामना खेळविला जाईल. यामुळे निवड समितीला इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारत ‘अ’ संघाची घोषणा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि सध्याची परिस्थिती पाहता कऊण नायरचा विचार होऊ शकतो. कऊण 2024-25 च्या स्थानिक हंगामात खूपच प्रभावी ठरला आहे.
रोहित शर्मा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दोन कसोटी मालिका पराभवांनंतरही इंग्लंडमध्ये भारतीय वरिष्ठ संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीतून अजूनही सावरत असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुऊस्तीवरही भारताचे लक्ष राहील. बुमराह मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे.









