अत्याधुनिक सुविधा असणार : किंमत अंदाजे 28,000 राहणार
नवी दिल्ली :
चीनी टेक कंपनी ओप्पोचा रेनो सिरीजअंतर्गतचा नवा फोन लवकरच सादर होणार असल्याचे संकेत आहेत. अंदाजे येत्या 12 जानेवारी रोजी ओप्पो रेनो 11 ची मालिका सादर होणार आहे. ओप्पोच्या आगामी स्मार्टफोन आवृत्तीत ओप्पो रेनो 11 5-जी आणि ओप्पो रेनो 11 प्रो हा 5-जी या प्रकारात सादर होणार आहे.
कंपनीने स्मार्टफोनमध्ये तारखेशिवाय आणि प्रोसेसर, कॅमेरा, चार्जिंग सपोर्ट आणि कलरचा पर्याय या संदर्भात माहिती दिली आहे. या फोनची मालिका ही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये सादर झाली आहे. सदर फोनची किंमत ही अंदाजे 28,000 असू शकते किंवा त्यांच्या वरील मॉडेलची किंमत ही 35,000 इतकी राहणार असल्याचे भाकीत केले आहे.









