नवी दिल्ली
आप्पो कंपनीने ए आवृत्तीचा नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. यामध्ये ओप्पो ए57 एस याला युरोपच्या बाजारात सादर करण्यात आले आहे. सदरच्या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह मीडिया टेक हीलियो जी 35 एसओसी, 50 मेगापिक्सलचा डबल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यासोबतच 33 डब्लू फास्ट चार्जिंग असणारा 5,000 एमएएच क्षमतेची मजबूत बॅटरी बॅकअप मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
हॅण्डसेट हा ओप्पो ए57(2022)सोबत मिळताजुळता आहे. ज्यामध्ये चालू वर्षाच्या सुरुवातीस भारतामध्ये डेब्यू केला होता. याचदरम्यान रियर कॅमेरा मॉडेलमध्ये प्रायमरी सेंसर आहे.
किमतीबाबत
ओप्पो ए 57 एस या मॉडेलच्या किमती संदर्भात कंपनीने कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. मात्र हे मॉडेल स्काय ब्लू आणि स्टाररी ब्लॅक कलर आदीमध्ये उपलब्ध होणार आहे.









