सावंतवाडी | प्रतिनिधी
नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी येथे नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला. यावेळी या शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन फित कापून डॉ. संकेत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. सर्व नेत्र रुग्णांनी यावेळी आभार मानले. अत्यंत कमी खर्चात नेत्र शस्त्र क्रिया व लेन्स बसवून मिळाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.
यावेळी डॉ . विद्याधर तायशेटे , माजी रोटरी प्रेसिडेंट विनया बाड., सौ जगदाळे, श्री सोमनाथ जिन्नी, डॉ . संकेत कुलकर्णी व श्री अनंत व्यंकटेश उचगावकर . आधी उपस्थित होते .









