बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून वस्त्रप्रावरणांच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या चांडक परिवाराच्यावतीने ‘जरदोसी’ या महिलांच्या वस्त्रप्रावरणाच्या शोरूमचे उद्घाटन सोमवारी होत आहे. श्री लक्ष्मी नारायण आर्केड, महात्मा फुले रोड शहापूर, बेळगाव येथे सुरू होत असलेल्या या भव्य शोरूममध्ये महिलांच्या मनपसंद साड्या, ड्रेस मटेरियल, लेहंगा, सूट्स उपलब्ध होत असून लग्नसराईसाठी नवनव्या व्हरायटीज आणि एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स ठेवण्यात येत आहेत. ग्राहकांना निवडीसाठी भरपूर वाव असल्याने लवकरच ही शोरूम नागरिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास जरदोसीचे संचालक चांडक यांनी व्यक्त केला आहे.









