लोकमान्य सोसायटी पुरस्कृत आयसीआयसीआयचे सहकार्य
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी पुरस्कृत आयसीआयसीआयच्या सहकार्याने दीपावलीनिमित्त एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या पटांगणात आकाशकंदील, पणत्या व दीपावलीचा फराळ यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मंगळवार दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून यावेळी व्हा. चेअरमन अजित गरगट्टी, सीईओ अभिजीत दीक्षित, एस. वाय. प्रभू, ज्ञानेश कलघटगी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, भंडारी स्कूल ऑफ आर्ट, हेरवाडकर स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्या मंदिर, व्ही. एम. शानभाग स्कूल, भंडारी स्कूल सहभागी होणार आहेत. दि. 7 ते 9 नोव्हेंबरदरम्यान दुपारी 4 ते 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे, असे कळविण्यात आले आहे.









