वेंगुर्ले (वार्ताहर)-
गौड सारस्वत समाज, वेंगुर्लेचे आयोजन
Open ‘Unique Couple 2023’ competition organized on 13th at Vengurle
वेंगुर्ले तालुका गौड सारस्वत समाजातर्फे दि. १३ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ले भटवाडी येथील श्री सिध्दीविनायक मंगल कार्यालयात सर्व जातीतील लोकांसाठी विवाहित दांम्पत्यांसाठी “युनिक कपल २०२३” या नावाच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे..या स्पर्धेत विवाहितच दांम्पत्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना वयाचे बंधन नाही. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रु. १५ हजार व मुकुट, व्दीतीय क्रमांक विजेत्यास रोख रू. ११ हजार व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक विजेत्यास रोख रू. ८ हजार व सन्मानचिन्ह अशी पारीतोषिके ठेवण्यांत आली आहेत. तसेच कॅटवॉक, बेस्ट कोऑर्डीनेशन व बेस्ट आऊटफिट यांना रोख रकमेची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी सुजाता पडवळ ९४२१२६८२३९ यांचेशी संपर्क साधावा. किंवा वेंगुर्ले सारस्वत बँक समोरील आरोग्यम फार्मा शॉपी, वेंगुर्ले येथे दि. १० मे पर्यंत नावे नोंदवावीत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गौड सारस्वत समाज, वेंगुर्लेच्या अध्यक्षा सौ. सुजाता पडवळ यांनी केले आहे.









