बेळगाव : कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्यावतीने खुल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. य् ाsडियुराप्पा मार्ग जुना पीबी रोड बेळगाव येथे आयोजन करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत संपूर्ण कर्नाटकातून जवळपास 220 स्केटर्स सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण कर्नाटक रोल संघटनो सरािाटणीस इंदुधर सीताराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँथनी जेमस, जयकुमार, स्मृती, अशोक गोरे, उमेश कलघटगी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, संतोष श्रींगारी, विनायक काकतीकर, सिंधू संबरगी, तुकाराम शिंदे, विविध जिल्हय़ातून आलेले स्केटर्स व त्यांचे पालक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
य् ाा स्पर्धसाठी वैद्यकीय प्राथमिक उपचार सुविधा एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने उपलब्ध केली. यावेळी रविश राव, निरंजन बाबू, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गंगणे, सक्षम जाधव, क्लिफ्टन बेरेटो, समीरा जाधव, रौनक, गणेश दड्डीकर, आकाश पठाडे, सचिन साळोखे, जैफ माडीवाले, सागर पाटील, अक्षय सूर्यवंशी, सुरज शिंदे, अजित शिलेदार, मंजुनाथ मंडोळकर, शुभम साखे, दीपक सोनार, अरविंद साळुंखे, सुमित वेर्णेकर, सोहम हिंडलगेकर, श्रीकांत कुर्याळकर, श्री तोरण, सागर चौगुले, आकाश, आणि इतरांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.









