कोल्हापूर :
व्यवसायिक रंगभूमी बरोबरच संगीत, हौशी, प्रायोगिक, बालरंग, वगनाट्या आदी सर्व प्रयोगांसाठी नाट्यागृह खुले करा. आगीची घटना घडली म्हणून नव्याने नाट्यागृह बांधतोय, असे न होता, काम दर्जेदार करा. आता नाट्याकर्मीना जे जे अत्याधुनिक आहे, त्याची सोय संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात करा, असे आदेश राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहांची त्यांनी शुक्रवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाहणीवेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, व्यवस्थापक समीर महांबरी, नाट्याकर्मी मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी नाट्यागृहाच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याची सुचना केली. यावर अधिकाऱ्यांनी हेरिटेज वास्तू असल्याने याला परवानगी मिळत नसल्याचे सांगितले. यावेळी निदान नियोजित कलादालनावर सोलर पॅनेल बसवा, अशी सुचना त्यांनी केली.
मंत्री सामंत म्हणाले, नाट्यागृह उभारण्याचा शासनाने शब्द दिला आणि निधी दिला. म्हणून बांधकाम करु नका. आपण जे काम करतोय ते दर्जेदार झाले पाहिजे. नाट्याकलाकारांच्या सूचनांनुसार झाले पाहिजे. नाट्यागृहात आवश्यक त्या अत्याधुनिक सोयी सुविधा उभारल्या पाहिजेत. प्रोजेक्टर आणि चित्रपटाच्या पडद्याची व्यवस्था करा. जेणे करून एखादा चांगला मराठी चित्रपट आला तर तो प्रेक्षकांना दाखवता येईल. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाही तर तो नाट्यागृहात दाखवला जातो, असा एक संदेश रसिकांमध्ये जाईल. त्याचे तिकीट नाममात्र ठेवा. असा प्रयोग सध्या रत्नागिरीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
- प्रशासकीय बाबींमुळे उशीर झाला
ते म्हणाले, नाट्यागृह उभारण्यासाठी शासनाने तातडीने निधी दिला. कामही सुरू झाले. मध्यंतरी काही प्रशासकीय बाबींमुळे उशीर झाला, हे खरे आहे. पण नाट्यागृहाचे काम दर्जेदारच केले जाईल. त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. काही रंगकर्मींच्या सुचना आहेत. त्या देखील सांगण्यात आल्या आहेत. हे नाट्यागृह व्यावसायिक रंगभूमीसाठी कमी दरात आवश्यक असेल तर ते उपलब्ध करुन दिले पाहिजे. खासबाग कुस्ती मैदानावर असणारा खुला रंगमंच देखील मोठ्या कार्यक्रमासाठी खुला केला पाहिजे. नाट्यागृहात बुकिंग नसेल तेव्हा शालेय विद्यार्थ्यांना इथे मराठी ऐतिहासिक चित्रपट दाखवले तर ते फायदेशीर ठरेल.
- आगीच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे
नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी ही झालीच पाहिजे. जे दोषी असतील ते तुरूंगामध्ये गेलेच पाहिजेत. ज्या गोष्टीचा तपास अहवाल आपल्याकडे आलेला नाही. त्यावर अहवाल आल्यानंतर आपण बोलू. या घटनेतील दोषींवर कारवाई होईल. ज्यांनी आग लावली तो नातेवाईक असला तरी तुरूंगामध्ये जाईल. मंत्री सामंत यांनी अन्य प्रश्नावरही मते व्यक्त केली. यामध्ये बिहारसाठी फेक नेरिटीव्ह
बिहारची निवडणूक आली आहे. त्यासाठी काहीतरी फेक नेरिटीव्ह पसरवायचे आघाडीकडून सुरू आहे. असे काहीतरी आरोप करायचे आणि जनतेची दिशाभूल करायचे काम विरोधकांकडून सुरू आहे.
- मग तुम्ही राजीनामे द्या.
लोकसभा निवडणूक ईव्हीएमवर झाली. आघाडीचे खासदार निवडून आले. त्यानंतर विधानसभेत त्यांचे उमेदवार पडले. मग शंका उपस्थित होऊ लागली. मग पहिल्यांदा ईव्हीएमवर निवडून आलेल्या त्यांच्या खासदारांनी राजीनामा द्यावा.
- नाट्यगृहात पहिल्या रांगेतून नाटक बघायचे असते.
जे नेते एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून टिका करतात. शिंदे दिल्लीला गेल्यानंतर त्यांचा फोटो नरेंद्र मोदींच्या बाजूला बसलेला येतो. आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांचा शेवटच्या रांगेत बसलेला फोटो येतो. नाट्यागृहात आल्यानंतर पहिल्या रांगेतून नाटक बघायचे असते. ते शेवटच्या रांगेतून राहुल गांधींचे नाटक बघत होते. त्यांना आता राहुल गांधी कायमस्वरुपी बाल्कनीतच बसवणार आहेत. ज्यांनी सावरकरांना शिव्या घातल्या, त्याच्या बाजूलाच बसून हे आज जेवण करत आहेत, हे महाराष्ट्राच दुदैव आहे.
- तो प्रत्येकाचा अधिकार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना महायुती म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे आमचे संघटन, सभासद नोंदणी, संघटना बांधणीसाठी म्हणून एकनाथ शिंदे यांनी आम्हाला विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बैठका घेऊन शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे, असे सांगतो. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सांगत आहेत. तसा तो प्रत्येकाचा अधिकार आहे.
- जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवायचा आहे
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले. इथुन पुढेही होईल. त्यासाठी पालकमंत्री आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर अशा सर्वांना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवायचा आहे.
- महादेवी परत आलीच पाहीजे.
कोल्हापूर हे संवेदनशील आहे. सध्या महादेवीला परत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. आम्ही सरकार म्हणून ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आहे. शिवसेना म्हण्tgन आमचीही हीच भूमिका आह,s की महादेवी परत आली पाहिजे.








