आचरा / प्रतिनिधी
त्रिंबक गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी शवपेटी खरेदी करत ग्रामपंचायत कडे सु्फूर्द केली होती सदर शवपेटी त्रिंबक ग्रामपंचायतने आचरा आरोग्य विभागला विनंती करत त्रिंबक उपकेंद्र येथे तात्पुरती ठेवली होती. मात्र आचरा विभागाचे वैद्यकीय अधिकारी कपिल मेस्त्री यांनी त्रिंबक ग्रामपंचायत ला पत्र काढत सदर शवपेटी अन्य ठिकाणी हालवण्यास सांगितल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आचरा आरोग्य केंद्रात धडक दिली यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत करत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे यांच्याशी सपंर्क साधून पेटी ठेवण्यावर तोडगा काढत केलेल्या यशस्वी शिष्ठाइमुळे पेटी ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला.
त्रिंबक उपआरोग्य केंद्रात पेटी ठेवण्यास आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी हरकत घेतल्यानंतर त्रिंबक गावचे सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, सुरेंद्र सकपाळ, डॉ सिद्धेश सकपाळ, संतोष घाडीगांवकर, विलास त्रिंबककर,विजय सावंत, चंद्रशेखर सुतार, विनायक त्रिंबककर व अन्य ग्रामस्थांनी आचरा आरोग्य केंद्रात धडक दिली व पत्राबाबत आरोग्य केंद्रात उपस्थित असलेले डॉ शामराव जाधव, डॉ कपिल मेस्त्री यांना जाब विचारत पत्राबाबत संताप व्यक्त केला. यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे आचरा आरोग्य केंद्रात दाखल झाले होते.
गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासते त्यावेळी आचरा आरोग्य केंद्र कोणत्याही सुविधा पुरवत नाही त्यावेळी हें हात वर करून मोकळे होतात. अशा प्रसंगी ग्रामस्थांना कणकवली मालवण गाठावे लागते ही गरज ओळखून ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च करून शवपेटी खरेदी केली तिची देखभाल साठी खाजगी माणूस नेमला ग्रामपंचायतजवळ पेटी ठेवण्यासाठीच्या इमारतीचे बांधकाम होईपर्यंत शवपेटी सुरक्षित रहावी म्हणून उपकेंद्र येथे आरोग्य विभागास विनंती करून ठेवण्यात आली होती सुरवातीस परवानगी देणारे आचरा आरोग्य विभाग आता हरकत घेत आहेत आपणही सुविधा द्यायच्या नाहीत आणि दुसरे देत असतील त्यालाही विरोध करायचा असे आडमुठे धोरण आचरा विभाग अवलंबत असल्याने अशा वृत्तीमुळे मदतीस पुढे येणारे युवक, सामाजिक संस्था या मदत करणार नाहीत ते मागेच जातील असे ग्रामस्थांनी सांगत यावेळी आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या कृतीवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.









