प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील आमच्या अनेक गावांचे शहरीकरण सद्ध्या जोरात चालू आहे. गोव्याला मुंबई करण्याचे प्रयत्न चालू आहे, आणि याच साठी टी सी पी खाते आणि विश्व्ा्रजीत राणे, जो आज गोवा वाचविण्याची भाषा करून, जनतेची दिशाभूल करू पाहतो. जनतेची सहानभुती मिळविण्यासाठी आपल्या मोजक्मयाच विरोधकांवर टीका करून आपण टी सी पी खात्यामध्ये होणारे गैरप्रकार बंद करण्याचे नाटक करत असल्याची टीका रेव्ह?लूशनरी गोवंन्स चे प्रमुख मनोज परब यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
टी सी पी खात्यामध्ये होणारे गैरप्रकार, भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आर. जी. ने. काल पणजी येथे, पत्रकार परिषद बोलावली होती. आज गावामध्ये मोठ मोठी बिल्डिंग तयार होतात. लहान लहान गावामध्ये बेकायदा बांधकामाना सर्रासपणे परवानगी देतात, टी सी पी आणि स्थानिक पंच- सरपंच यांच्या संगमताने उभी राहतात. कित्येक पंचायतीमध्ये आज हे गैरप्रकार चालू आहे. बेकायदा बांधकामांना परवानगी दिली जाते, मोठ मोठय़ा दलालांकडून मोठी रक्कम घेतली जाते, तीच रक्कम नंतर निवडणुकां मध्ये लोकांना दिली जाते, पुन्हा हेच भ्रष्टाचारी पंचायती मध्ये निवडून येतात. आमचे गाव परत त्या बाहेरच्या दलालांच्या घशात घालतात. अशी माहिती परब यांनी दिली.
आज उघडपणे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आणि टी सी पी खात्याकडून होत असल्याचा आरोप यावेळी मनोज परब यांनी केला. जर प्रशासकीय अधिकाऱयांनी तसेच टी सी पी खात्याने व्यवस्थित आपली जबाबदारी निभावली तर असे बेकायदा प्रकार बंद होतील. बाहेरच्या राज्यातील बिल्डर गोव्यातील जमिनी हडप करू शकणार नाही.
आज अश्या बेकायदा बांधकामे उघड करण्याऱयावर कारवाही केली जाते त्यांना सतावले जाते. भ्रष्टाचार करणाऱयावर कार्यवाही करण्याऐवजी सामान्य जनतेची छळवणूक केली जाते. याला पूर्ण जबाबदार स्थानिक पंच सरपंच आहे. बिल्डर लॉबी बरोबर हातमिळवणी केली जाते. सगळय़ांना हफ्त? पोहोचतात. सगळे बरोबरिने चोरी करतात. अश्या तरेने पूर्ण गावाची नाशाडी केली जाते, असेही मनोज परब म्हणाले.
रेव्ह?लूशनरी गोवंन्स ने आज याच साठी पंचायत निवडणुकीत भाग घेतला आहे. कित्येक युवांना पंचायत निवडणूक लढवण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले आहे. जेणेकरून ही मुले आपला गाव, आपल्या गावाचे भवितव्य स्वतः सुरक्षित करतील. आपल्या पंचायतीमध्ये लक्ष ठेवतील. जर आज आम्ही पंचायत सिस्टीम मध्ये गेलो नाही तर, भ्रष्टाचारी पंच सरपंच अशी बेकायदा कामांना परवानगी देत राहील, असेही ते म्हणाले.
कित्येकवेळा हेच टी सी पी वाले सामान्य गोवेकराना एका रस्त्यासाठी घर बांधण्यासाठी सतवणुक करतात, पण बेकायदेशीर व्यवहार करणाऱयांना प्रोत्साहन देतात. पुढे बोलताना परब म्हणाले की अश्या कित्येक फाईल्स विशवजीत राणे यांच्या ऑफिस मध्ये तसेच टी सी पी खात्यामध्ये पाठवणार असल्याची माहिती दिली. विश्वजीत राणे यांना किती गोवेकराविषयी प्रेम आहे. गोव्यातील जमिनी राखण्यासाठी काय करतात ते आम्ही पाहू असे परब म्हणाले.
कित्येक विरोधक आज रेव्ह?लूशनरी गोवंन्स लहान गरीब लोकांच्या पोटावर आड येतात अशी खोटी बातमी पसरवतात, पण आम्ही स्पष्टीकरण देऊ इच्छितो की, हेच भेळपुरी, फळविपेते दोन नंबरचा व्यवसाय करून आज मोठ मोठय़ा बंगल्यानी राहतात. गोव्यातील जमिनी बळकावतात. आम्ही लहान मोठे अनेक बेकायदा प्रकल्प अडवले असून, यापुढेही आम्ही बेकायदा कामावर आवाज उठवत राहणार असल्याचे मनोज परब यांनी यावेळी स्पष्ट केले. टी सी पी खात्याने अश्या गैरप्रकाराना प्रोत्साहन देऊ नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केले.









