प्रत्येक मानवसमूहाची काही वैशिष्ट्यो असतात, हे आपल्याला ज्ञात आहे. काही वैशिष्ट्यो या मानवसमूहाची सकारात्मक ओळख म्हणून पुढे येतात. तर काही वैशिष्ट्यो अशा मानवसमूहासंबंधी दया किंवा सहानुभूती उत्पन्न करतात. झिम्बाब्वे या देशाच्या घनदाट वन विभागात एक अदीम मानवसमूह असून या समूहात जन्मलेल्या लोकांच्या पायांना केवळ दोन अंगठे असतात. इतक कोणतेही बोट नसते. ही माहिती अविश्वसनीय पण सत्य आहे, असे तज्ञांचे मत आहे.
ही अदीम जमात वडोमा या नावाने परिचित आहे. हे लोक अन्य जमातींपासून दूर एकांतात राहण्याला प्राधान्य देतात. तसेच ते ‘लाजाळू’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपल्याआपल्यात राहणे आणि समाजापासून दूर राहणे या त्यांच्या सवयींमुळे बऱ्याच शतकांनंतरही ही जमात अपरिचितच राहिली होती. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये तिचा अभ्यास करण्यात आला आहे. तिच्या चालीरीती, समजुती आणि श्रद्धा यांचा परिचय इतर जगाला होत आहे. या जमातीत जवळपास प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या प्रत्येक पायाला दोन अंगठे असतात. इतर कोणतेही बोट नसते, हे अभ्यासासून दिसून आल्याने संशोधकही चाट पडले आहेत.
एक युरोपियन प्रवासी आणि संशोधक डू बिन्स्की यांनी या जमातीच्या लोकांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांच्याशी बोलून या वैशिष्ट्याची छाननी केली आहे. तसेच हा प्रकार खराच आहे, याला दुजोरा दिला आहे. या जमातीतील बव्हंशी माणसांच्या पायांची स्थिती अशी का आहे, याचे संशोधन करण्यात येत आहे. कदाचित, हे जनुकीय त्रुटींमुळे होत असावे. याच जमातीचा अन्य कोणत्याही जमातीशी संपर्क अथवा शरीरसंबंध आलेला नाही. त्यामुळे पिढान्पिढ्या ही जनुकीय त्रुटी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा हस्तांतरीत होत असावा. पण या जमातीतील लोकांच्या पायांमुळे अन्य जमातींमधील लोक त्यांच्याशी संपर्क टाळतात, त्यामुळे ही जमात एकटी पडली असून सामाजिक रोषाचा बळीही ठरली आहे. आता संशोधन या समाजातील या त्रुटीचा अभ्यास करुन त्यावर काही उपाय करता येतो काय हे पाहणार आहेत. हे संशोधन मानवी जनुकीय संरचना आणि तिच्यातील गुंतागुंत समजून घेण्यास उपयुक्त ठरणार असून भविष्यकाळात औषध योजना करण्यासाठीही त्याचा विशेषत्वाने उपयोग होईल ही शक्यता आहे.









