सातारा: दहशदवादी यांच्यासोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका जवानाला वीरमरण आलं. जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावाचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना शाहिद झाले. जम्मू काश्मीर मधील जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत रात्री साडे दहाच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी २२ मे) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ या गावचे प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. वयाच्या 22 व्या वर्षी दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांना वीरमरण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश गोळी लागून जखमी झाले होते. त्यानं रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.