कोकणात जाणारी /येणारी एस टी वाहतूक दिवसा सुरु, रात्री, बंद
राधानगरी / महेश तिरवडे :
राधानगरी ते दाजीपूर या मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राधानगरी आगारातील हसणे, न्यू करंजे, राऊतवाडी, मांडरेवाडी, शेळप, बांबर, सतिचामाळ या परिसरातील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने 2 एप्रिल रोजी फेजिवडे येथील पुलाजवळील रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावर मुरुम आणि माती टाकून एकेरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावरून दिवसा बससेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दाजीपूर मार्गे येणाऱ्या – जाणाऱ्या बस दिवसा सुरू राहणार आहे,कणकवली विभागातून दाजीपूर-राधानगरी मार्गे येणाऱ्या – जाणाऱ्या बस दिवसा सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचे प्रशासनाने कळवले आहे. मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
- प्रवाशांना सहकार्याचे आवाहन
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. तोपर्यंत प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








