ऑनलाईन टीम / तरुण भारत :
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमच्याकडे आता फक्त 3 दिवसांचा वेळ आहे, असा उल्लेख असणारा फोटो आझमी यांच्या व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आझमी यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर धमकीचा फोटो पाठवण्यात आला आहे. तो फोटो आझमी यांचा असून, त्यावर बंदूक रोखत ते टार्गेट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच रक्ताने माखलेला चाकू देखील फोटोवर लावण्यात आला आहे. आता फक्त 3 दिवसांचा वेळ आहे, असाही उल्लेख या फोटोवर आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आबू आझमी यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आवाहन आझमी यांनी केले आहे.








