कामादरम्यान ब्रेक, स्ट्रेचिंग आवश्यक
कॉम्प्युटरवर दीर्घकाळापर्यंत काम केल्याने होणाऱ्या पाठ किंवा मानदुखीच्या वेदनेला दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. पाश्चिमात्य देशांनी याला ‘ऑनलाइन स्पाइन’ नाव दिले आहे. अमेरिकेत संगणकावर काम करणाऱ्या 2 हजार लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून अधिक वेळ कॉम्प्युटरसमोर बसून राहणे मान आणि पाठदुखीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे आढळून आले.

सर्वात प्रथम काम करण्याची जागा एर्गोनॉमिक स्वरुपात योग्य असावी. संबंधिताच्या दोन्ही बाजू योग्य कोनावर आणि स्क्रीन डोळ्यांच्या पातळीसमोर असावी असे मॅसाच्युसेट्समधील शारीरिक चिकित्सेचे तज्ञ एडवर्ड वेई यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, फिरून या
जर तुम्ही ऑनलाइन स्पाइनचा त्रास टाळू इच्छित असल्यास दर अर्ध्या तासात उठून चालण्यासाठी एक टायमर सेट करावा. ही कृती काही मिनिटांसाठी का असेना, काहीच न करण्यापेक्षा हे चांगले ठरेल असे मेयो क्लीनिकमधील शारीरिक चिकित्सेच्या सहाय्यक प्राध्यापिका कारा प्राइडॉक्स यांनी म्हटले आहे.
वेदना झाल्यास स्ट्रेच करा
‘एव्हरी बॉडी योगा’च्या लेखिका जेसामिन स्टॅनली यांनी पाठ अन् खांदेदुखी होत असल्यास सिम्पल स्ट्रेचिंग करून पहा असे सुचविले आहे. पाठ, खांदे अन् मानदुखीसाठी वेगवेगळी स्ट्रेचिंग एक्सरसाइज केली जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. लोअर बॅकची वेदना अनेक कारणांमुळे असू शकते. परंतु ऑनलाइन स्पाइनमुळे संबंधित पाठदुखी फोन अन् टॅबलेट पाहून होणारा तणावा ‘टेक नेक’च्या विपरित आहे. अशाप्रकारची वेदना मान, खांदे अन् पूर्ण पाठीला प्रभावित करू शकते.









