सातारा :
ऑनलाईन कामाच्या नावाखाली विविध प्रॉडक्ट दाखवून त्याच्या खरेदीवर डिस्काउंट देण्याच्या बहाण्याने दौलतनगर येथील महिलेची 21 लाख 38 हजारांची केली फसवणूक झाली आहे. मंजुळा राहूल घाडगे (दौलतनगर, सातारा) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंजुळा घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इन्स्टाग्राम अकाउंटधारक महिला निरंजना यांच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात मंजुळा घाडगे या इन्स्टाग्रामवर ऑनलाईन काम आहे का हे पाहत होत्या. यावेळी फ्लेम स्क्रिबलर या कंपनीची त्यांनी जाहिरात पाहिली. या जाहिरातीवर दिलेल्या नंबरवर त्यांनी फोन केला. यावेळी निरजंना नावाच्या महिलेने त्यांना कामाची माहिती दिली. नंतर वेगवेगळ्या लिंक पाठवून प्रॉडक्ट लाईक केल्याने 20 टक्के डिस्काउंट देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून मंजुळा यांनी प्रॉडक्ट लाईक करून पाठवलेल्या पैशावर 20 टक्के डिस्काउंट दिला. सुरूवातील मंजुळा यांनी भरलेल्या रक्कमेवर परतावा दिला. मात्र, नंतर 21 लाख 38 हजार रूपये भरलेल्या रक्कमेवर परतावा दिला नाही. याबाबत मंजुळा यांनी वारंवार दिलेल्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे व परतावा काहीच परत मिळाले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्या इन्स्टाग्राम अकाउंटधारक महिलेविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत.








